सीबीआरई कॅपिटल मार्केट्सने 50% बाजारहिस्सा मिळवून भारतात साध्य केले अग्रेसर स्थान
सीबीआरई कॅपिटल मार्केट्सने 50% बाजारहिस्सा मिळवून भारतात साध्य केले अग्रेसर स्थान
– कमर्शिअल रिअल इस्टेटने (सीआरई) 2018 मध्ये 4.7 अब्ज डॉलर गुंतवणूक नोंदवली. सीबीआरईच्या भांडवल बाजार टीमने केले 2 अब्ज डॉलर मूल्याचे व्यवहार
– व्यवहारांमध्ये 40% हून अधिक हिस्सा मिळवून मुंबईने एकंदर क्षेत्रामध्ये मिळवले प्रभुत्व
17 मे 2019: सीबीआरई साउथ एशिया प्रा. लि. या भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट कन्सल्टिंग फर्मने आपल्या भांडवल बाजार टीमने केलेल्या व्यवसायाची आकडेवारी आज जाहीर केली. या टीमने 50% बाजारहिस्सा मिळवून याक्षेत्रामध्ये अग्रेसर स्थान निर्माण केल्याचेही कंपनीने जाहीर केले.
भांडवल उभारणे, जमिनीची विक्री, संयुक्त विकास व विकास व्यवस्थापन करार यासह जमीनविषयक सेवा; कोअर अॅसेट सेल्स, एचएनआय व फॅमिली ऑफिस अॅडव्हॉयजरी व फंड पोर्टफोलिओसाठी अॅडव्हॉयजरी अशा सेवा देणाऱ्याभांडवल बाजार टीम ग्राहकांना विविध प्रकारच्या व्यवहारांमध्ये मदत केली, जसे इन्व्हेस्टमेंट सेल्स, परकीय गुंतवणूक (एफडीआय), स्ट्रक्चर्ड डेट्, कन्स्ट्रक्शन फायनान्सिंग व एलआरडी, इक्विटी प्लेसमेंट, कोअर अॅसेट सेल्स.
2018 मधील कमर्शिअल रिअल इस्टेटमधील (सीआरई) एकूण 4.7 अब्ज डॉलर या एकूण गुंतवणुकीपैकी 2 अब्ज डॉलर इतक्या मूल्याचे व्यवहार सीबीआरईच्या भांडवल बाजार टीमने अमलात आणले.
या यशाविषयी बोलताना, सीबीआरईचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत, आग्नेय आशिया, मध्य पूर्व व आफ्रिका) अंशुमन मॅगझिन यांनी सांगितले, “भांडवल बाजार टीमने भांडवलविषयक सेवा देणारी कंपनी म्हणूनयशस्वीपणे स्थान निर्माण केले आहे, तसेच विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध केल्या आहेत – भांडवल उभारणे, जमीन, एचएनआय अॅडव्हॉयजरी व कोअर ऑफिस अॅक्विझिशन/डिव्हेस्टमेंट सेवा. 2018 मध्ये व्यवसायाने आजवरचाउच्चांक गाठला व जमीन व भांडवल बाजार या बाबतीत भारतात सलग तिसऱ्या वर्षी पहिले स्थान मिळवले.”
भांडवल बाजाराच्या 2018 मधील एकंदर कामगिरीविषयी बोलताना, सीबीआरईचे व्यवस्थापकीय संचालक व भांडवल बाजार सह–प्रमुख गौरव कुमार यांनी नमूद केले, “आम्ही अगोदरच्या वर्षातही देशातील प्रमुख भौगोलिक ठिकाणीविस्तार केला. आम्ही यशस्वीपणे काही व्यवहार पूर्ण केले व त्यामुळे आम्हाला या क्षेत्रामध्ये सीबीआरईचे आघाडीचे स्थान अधिक बळकट करता आले.”
भांडवल बाजार टीमने भांडवलाची महत्त्वाची तरतूद करून उद्योगाच्या वाढीमध्ये लक्षणीय योगदान दिले आहे आणि कमर्शिअल रिअल इस्टेट उद्योगाच्या भांडवल व गुंतवणूकविषयक सर्व गरजा एकाच ठिकाणी पूर्ण करण्यासाठीस्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
“सीबीआरईसाठी 2018 हे अतिशय यशस्वी वर्ष होते; आम्ही वाढीच्या बाबतीत सातत्यपूर्ण सकारात्मक आलेख कायम राखला आणि भांडवल बाजाराने त्यामध्ये लक्षणीय योगदान दिले. आगामी वर्षांतही उत्तम वाढ होईल, असा आमचाअंदाज आहे,” सीबीआरईचे व्यवस्थापकीय संचालक व भांडवल बाजार सह–प्रमुख निखिल भाटिया यांनी सांगितले.
भांडवल बाजार टीमने 2018 मध्ये भारतात काही
I.K Kapoor